अरे पावसा

आणखी एक oven fresh रचना

अरे पावसा

अरे पावसा
असा कसा
आडवा तिडवा
पडतोस तू
अरे पावसा

सांग मला हळूच
कानात माझ्या
गुपित दोघात
राहिल आपल्या
आनंदाने हुंदडून
उड्याच मारतोस
की गडगडाटा
मागून रडतोस तू
अरे पावसा

सरी वर सरी
आणि धारे वर धार
अंत नाही तुझ्या बाबा
पडण्याला फार
अरे पावसा

पाहिले मी पहिल्यांदा
जेव्हा तुला रे
अलगद मोरपीस
भासलास तू
अरे पावसा

तुझ्या रुपाचे मी
काय गुण गाऊ
सगळ्यांना वाटतोस
हवासा भाऊ
पण एक सांगू का रे
समजून घे रे
तुझ्यामुळे झाला
खूप मोठा पसारा
भिजताना पाहिले मी
भो भो नी माऊ
एक छत आणि ते
गळणारे होते
त़्या खाली तरी कुटुंब
राहत होते
त्यांनीच दिलाय बरंका
दोघांना आसरा
अरे पावसा

अरे पावसा
एक मात्र खरे की तू
हवासाच असतो
आणि मग हलकेच
नकोसा ही होतोस
वाईट वाटून घेऊ नको
आपण दोघे मित्र
एकमेकांशी गट्टी आपली
नेहमीचे सूत्र
शाळा सुटून उशीर झाला
जायला हवे घरी
खेळत असेल पावसात
आईला खातरी
चल चल वेगे वेगे
घरी माझ्या जाऊ
तू आपला बाहेरच थांब
आणतो तुला खाऊ
अरे पावसा ..
    *©अँब्रोस चेट्टियार*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी