तळ नितळ

 तळ नितळ


स्वच्छ नितळ गे माये 

तळ माझे हृदयीचे 

तेथे नाही कुणी बागडत

जळ, फळ, नीरन डहुळलेले 

स्वच्छ नितळ गे माये 

तळ माझे हृदयीचे


कोलाहल तो उभा बाह्हत: 

अंतरी ती शांतता 

हास्यविनोदी नाही खेळ

नाही गे हृदयात 

स्वच्छ नितळ गे माये 

तळ माझे हृदयीचे


आरपार दिसते मजला 

केवळ स्वच्छ स्वच्छ

अडवाया दृष्टी नाही 

कोणी तिथे इवलाले

स्वच्छ नितळ गे माये 

तळ माझे हृदयीचे


सुख पावे ते पाहुन डोळा 

जगी चालला लेकुरमेळा

अंतरीपरी सर्व रिते ते

रिताच मेळा खेळा 

स्वच्छ नितळ गे माये 

तळ माझे हृदयीचे


येणे एकल, जाणे एकल 

दरम्यान कुणी ना साथी केवळ

डोळा वाटेवरी शोधतो 

पाऊल ते इवलाले...

स्वच्छ नितळ गे माये 

तळ माझे हृदयीचे

     *अँब्रोस चेट्टियार*

बोट धराया यावे यावे 

वाटे 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी