प्रकृतीची भेट
प्रकृतीची भेट
त्या नऊ दहा महाद्वारांपेक्षा
अधिक उणे घेऊन अवतरलेली
कोणतीही मानवरूपी शक्ती
सृजनक्षम नसते
कोणीही मानव
मौल्यवान धातूचे अंक
वा आंतरिंद्रीयादी विशेष घेऊन लेवून
जन्माला येत नसतो.
लांबी, रुंदी, उंची, रंग,रूप आदी
ह्यातच काय तो दृश्यमान फरक
मात्र विशेष अंग
ह्या व्यतिरिक्त कोणास नाही
आपल्या मेंदूने,
आपल्या प्रयत्नाने, चिकाटी यत्नाने
जो तो होतो विशेष
अन्य काही स्पर्श त्यास नाही
कळते हे ज्यास जितके
तो जाणतो निर्वाणा
होऊन जन तो तारी
तितकाच को शहाणा
येणे जाणे प्रकृतीचा खेळ
जिवाची निवड जिवाचा मेळ
होऊन मदांध भूपती बांधी मुठीत वेळ
सरते क्षणी त्या उमगे हाताशी उरला काळ
क्षण एक एक वाटे तो प्राप्त ज्यास ज्ञान
उद्धारुनी जगास मिळवोनी समाधान
करुणा दया नी शांती शिकवीत जात आहे
प्रकृतीची भेट मनुजा प्रकृतीस देत आहे
*©अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा