कुस्ती मेडल विनेश ऑलिंपिक आणि एकूणच खेळ 

यात खेळ कुठेच नाही .. 

फक्त खेळाशी सर्वच स्तरावर सर्वमान्य बेईमानी दिसते.. कौशल्य न दिसता फक्त युक्त्या आणि क्लृप्त्या दिसतात आणि मन विषण्ण होते .. हे कसले खेळ ? 

नियमात आमुलाग्र बदल व्हायला हवेत वजन होताक्षणीच कुस्ती व्हायला हवी म्हणजे बेईमानीचा प्रश्नच येणार नाही. त्यात त्यावेळच्या जेवणाचे खाण्यापिण्याचे अधीकचे वजन वजा करावे ..आणि सलग वजन घ्यावे खेळाडूचे अगोदरच्या वजनी गटाचा परामर्श घ्यावा ..त्यानुसारच पुढे खेळू द्यावे बेइमानी करण्याची मुभाच देऊ नये..

परंतु विद्यमान नियमात बसून केलेला खेळ मात्र खेळ संस्था ही कटात सहभागी असताना एकट्या खेळाडूला पूर्वग्रहदूषित विचारांनी एकटे पाडणे केव्हाही अयोग्यच ...यात त्या खेळाडूचीच नाही तर त्या देशाची आणि खेळ संस्थेची ही अब्रू वेशीवर टांगली जाते हे निर्विवाद ... ऑलिम्पिक सारखे खेळही जर इतके कट कारस्थानातून जाऊन खेळण्यापेक्षा देशाच्या प्रगतीस पोषक इतर गोष्टींत तरूणांनी लक्ष घालावे .. 

विषयाचा विचार करताना शिसारी येत होती .. 

खेळ फक्त नावाला खेळ आहेत 

त्यातून फक्त खेळ मात्र हद्दपार आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी