नव्वी कोरी ऑटो ? सांभाळा.

 

आठवलं आणि राहवलं नाही म्हणून पोष्ट प्रपंच ...
नुसते काहूर ...क्षुल्लक वाटावी अशी घटना ...

संध्याकाळी एक काम करून परतताना ऑटो शोधत होतो तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या एकच कुटुंबातील असाव्यात असे वाटणाऱ्या सुखवस्तू कुटुंबातीलशा महिलाही जाण्याच्या तयारीत होत्या तेवढ्यात समोर एक  रिकामा ऑटो ही दिसला कदाचित त्यांना ती ऑटो हवी असेल अशी त्यांची हालचाल .. म्हणून आपण दुसरी ऑटो घेऊ असे मला वाटले ..पण त्या थांबल्या आणि म्हणून मी ऑटो जवळ गेलो तेव्हा त्यां महिला प्रवाशांच्या अपेक्षेने थांबलेले असे चेहेरा सांगत होता असे ऑटो चालक साधारण (साठीचे) ६० चे ..  महिला तर थांबलेल्या होत्या म्हणून मी पुढे होऊन ऑटो काकांना विचारले waiting का ?  त्यांचे लक्ष पुन्हा त्या महिलांकडे गेले.. म्हणून एकदा ऐकले वा समजले नसावे असे वाटले म्हणून दुसर्यांदा विचारले तरी ढीम्म ..उत्तर आले नाही..तिसऱ्यांदा पुन्हा विचारणार आणि पुढची ऑटो पाहणार असे मी ठरवले तर तेच स्वतःहून विचारते झाले "कुठे जायचे आहे? ". हं! एव्हाना त्यांची खात्री झाली असावी की त्या' येणार नाहीत..आता हा आलेला पॅसेंजर घ्यावा.. मी माझे गंतव्य स्थान सांगितले. ते तयार झाले.  बस म्हणाले. मी बसलो .. आणि तेवढ्याशा वार्तालापात त्यांचा तो थंड प्रतिसाद मला विचलित करून गेला. ऑटोला दार होते माझ्या उजव्या हातात पिशव्या होत्या आणि डाव्या हाताची बोटे जायबंदी होती. तरी प्रयत्न केला मग सौम्य स्वरात म्हणालो. दार उघडाना.  त्यांनीही ते उघडले. लगेच ट्रॅफिक लागले . ते थांबले . सावकाश रस्ता मोकळा झाल्यावर हळूच ते निघाले. पण हायवे लागताच रस्ता मोकळा असतानाही गाडी अनावश्यक उडत होती.. पाहिले तर जिथे जिथे रस्त्याला ठिगळ होते  होते तिथूनच ऑटो जात होती उर्वरित अख्खा रस्ता चांगला असताना ..
झाले ! गाडीचे निरीक्षण आणि व्यक्तींबद्दलचे विचार सुरू झाले. असला attitude असल्या सेवेत नसावाच.. मुळात तो कोणत्याही व्यवसायात नसावाच. पण काहीतरी गडबड असेलसे वाटले. खाकी वर्दीधारी म्हणजे ड्रायव्हर मालक नाही .. गाडी मात्र नव्वी कोरी, छान दारवाली.  अगदी चकचकीत गाडी ..वाटले. विचारावे . हंss! .
सिग्नल लागला... सुटला .. पुढेही तेच..रस्ता मोकळा असतानाही नको त्या ठिकाणी मुद्दाम गाडी जात होती.. उडत होती ..पुढच्या चाकाजवळ झटके बसत होते.. वाटले मालकाचे यश पाहवत नसेल का?  कदाचित. मग वाटले.. असेल काही कारण . मला ठसका लागला तसा मी घसा खाकरला नी अचानक गाडी थांबायला लागली नी तिकडून प्रश्न आला .. " इथे ? "
मी म्हटलं "मी काहीच बोललो नाही..पुढे त्या झाडापर्यंत घ्या "
खरे मला घरापर्यंत यायचे होते पण असह्य झाले, म्हटले सोडावी ऑटो .. थोडे चालत जावे. झाड आले, ऑटो थांबवली, पैसे दिले, उतरलो ..पण तो भाव ते वागणे काही केल्या डोळ्यासमोरून जाता जात नव्हते..खूप विचित्र वाटले..एक वाटले की त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही.. त्यांचे आपले काहीतरी कारण असेल. बिनसले असेल .. मनोमन म्हटलं त्यांचे प्रश्न लवकर सुटोत.. ..
....पण आणखी एक प्रश्न आहे ना. त्याचे काय ?
कोणीतरी ती ऑटोरिक्षा नुकतीच विकत घेतली आहे .. त्यावर कर्ज असू शकते.. उगाच चालवायला दिली नसेलना ? . पण ह्या काकांनी त्या गाडीवर रस्ताभर खुन्नस काढल्या सारखे केले होते.. नव्वी कोरी गाडी.. अशाने दहा दिवसात खुळखुळी होण्याच्या मार्गाला लागेल.. प्रवासात मनात आलेलं होतं की विचारावे,  " रस्ता चांगला असताना गाडी खुळखुळी करताय दुसऱ्याची ? " पण नाही विचारले ..प्रवास संपला मी उतरलो..पण आता मात्र त्या प्रसंगाने झोप उडाली होती..म्हणून मन हलके केले ..
शेवटचे दोन शब्द
*एक आवाहन*
नवीन ऑटो घेतलेल्या नागरिक भगिनीबांधवांना सांगणे .. कृपया आपल्या गाडीची काळजी घ्या आणि चालक पारखून घ्या.. तुमच्या मेहनतीचे इथे मातेरे तर होत नाही...*
©*अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी