का प्र शिबिर 01sep24
*अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर* , आयोजित
*कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर* , वृत्तांत..
दिनांक : 01/09/2024 रोजी
वेळ : स.10 ते सायं 5
स्थळ : मो ह विद्यालय, ठाणे पश्चिम.
🍁*नियोजन*🍁
.. अंनिस *कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर* लवकरच घेण्याचे नियोजन ऑगस्ट महिन्यातच पहिल्या आठवड्यात केले गेले होते. यासोबत *सभासद नोंदणी अभियानही* चालवावे असेही ठरले . परंतु कार्यकर्ता शिबिर या संकल्पनेस गालबोट न लागता काय वेगळेपण यात आणता येईल की जेणे करून पहिल्यांदाच येणाऱ्या सदस्यांना पुन्हा यावे असे वाटेल आणि किमान बैठकीस ते येऊ लागतील याबाबतीत उहापोह झाला आणि शिबिराचे कार्यक्रम-नियोजन त्याबरहुकूम केले गेले.
👉त्यातील पहिले आणि अत्यंत महत्वाचे पाऊल म्हणून *कार्यक्रमाचे गांभीर्य आणि महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, विशेषकरून अंनिसच्या हितचिंतक, विविध क्षेत्रातील नामवंत, अनुभवी आणि कार्याची ओळख असलेले मान्यवर, यांना आमंत्रित करण्याचे योजले गेले. त्यांचे *नोकरी, व्यवसायातील तसेच सामाजिक कार्यातील अनुभव व अंनिस* आणि त्याला जोडून *कार्यकर्ता प्रशिक्षणाचे महत्त्व* असा विषय देण्यात आला.
👉*आगत स्वागत इत्यादी गोष्टींना बाद करायचे ठरले.*
👉 उपलब्ध संसाधनांचाच योग्य तो पुरेपूर वापर करत कमीतकमी खर्चात उत्तम शिबिर पार पडावे याकरिता आवर्जून प्रयत्न केले गेले.
👉तसेच सलग सप्रयोग व्याख्यान न देता अभिवादन गीत मग एखादा चमत्कार, थोडी माहिती द्यावी. *उपस्थितांचे मनोगत* अंनिसशी त्यांची ओळख किंवा कार्यकर्ता प्रशिक्षण* बद्दल त्यांचे प्रश्न वा विचार घ्यावे आवश्यकता भासल्यास त्याचे निराकरण, थोडे मार्गदर्शन.
👉 कायदा त्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न आणि बलिदान याची माहिती . कायद्याची थोडक्यात ओळख ..
*मग पुन्हा चळवळ गीत*
*डॉक्टरांसोबतचा एखादा प्रसंग त्यावेळचे त्यांचे एखादे वाक्य आणि अथवा अंनिस मधील विशेष अनुभव, प्रसंग आणि अथवा डॉक्टरांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन त्यावर थोडी चर्चा
*मग पुन्हा गरज भासल्यास एखादे चळवळ गीत*
*पुन्हा चमत्कार त्याबद्दल विचारणा झाल्यास लगेच स्पष्टीकरण आणि हसत खेळत मार्गदर्शक व्याख्यान , कुठेही अट्टाहास नको किंवा बोजड , लादणे नको, असे शिबिराचे स्वरूप ठरले. त्या बरहुकुम तयारी झाली.
🍁 *प्रारंभ* 🍁
👉 प्रत्यक्ष शिबिर स्थळी रीतसर सदस्य नोंदणी आणि चहापान इत्यादी होऊन कार्यक्रम 10:30 वाजता सुरू झाला.
*सर्वप्रथम संविधान प्रतिमा आणि डॉ. दाभोलकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले गेले.
*अभिवादन गीत गाऊन कार्यक्रमाची रीतसर सुरुवात झाली.
👉 🙏 *उद्घाटन* 🙏
*चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन* व्याख्यानाचा पहिला भाग म्हणून पाण्याचा दिवा लावून चमत्काराच्या सप्रयोग व्याख्यानाचे *उद्घाटन हितचिंतक थिराणी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका संध्या धारडे मॅडम यांच्या हस्ते माई वंदना शिंदे यांनी केले.*
👉यानंतर *डॉ. दाभोलकर घरोघरी* या मालिकेतील द्वितीय *पुस्तिकासंचाचे औपचारिक प्रकाशन मो. ह. विद्यालयाचे माननीय मोरेसर आणि उपस्थित नवीन सदस्य IT क्षेत्रात पारंगत राहुल शिंदे आणि अर्चना शिंदे उभयतांचे हस्ते झाले.*
👉या नंतर ठाणे शहर अध्यक्ष अंनिस या नात्याने माईं वंदना शिंदे यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराबद्दल प्रास्ताविक केले. त्यात संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम आणि चमत्काराचा कार्यक्रम याबद्दल अगदी काही शब्दात सांगून उपस्थितांची उत्सुकता वाढविली.
👉 यानंतर सर्वांशी संवाद साधताना उपस्थित 30 ते 32 जुन्या नवीन सदस्यांचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी त्यांचे प्रश्न मागविण्यात आले. यासदरात विशेषत: त्यांची *ओळख व्यवसाय आणि अंनिस कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमास येण्याचे प्रयोजन* असे स्वरूप ठेवून प्रत्येकी 2 ते 3मिनिटे वेळ देण्यात आला .. यास उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांच्या प्रश्नरूप समस्यांचे तात्काळ निराकरण करून टप्प्याटप्प्याने कार्यकर्ता प्रशिक्षणाची आवश्यकता अजून अधोरेखित झाली.
👉 कार्यकर्ता प्रशिक्षण हा प्रेरणादायक आणि आत्मिक समाधान मिळवून देणारा भाग असून चळवळीच्या गीतांतूनही प्रबोधन करता येते हे दिसून आले. *ज्येष्ठ कार्यकर्ते एस. एस. शिंदे सर यांची अचूक, चपखल शब्दयोजनेमुळे आणि प्रचलित लोकगीतांच्या मनोरंजक चालीवर बांधलेली चळवळगीते* चमत्कार व्याख्यान यांच्या मध्ये मध्ये गुंफत कार्यकर्ता अँब्रोस, कल्पना पुष्पा ताई, हेमलतामॅडम, ज्योतीमॅडम आणि अर्थात माई यांच्या साथीने जोशात सादर केली..
*उपस्थितांचे अनुभव*
*आपल्या आयुष्यातील व समाजातील अंधश्रद्धा, आणि अंनिस* असे उपस्थितांचे मनोगत घेण्यात आले. विविध अनुभवांनी हे सदर रंगले. त्यातून अनुत्तरित राहिलेल्या काही प्रश्नांची उकल माईंनी प्रातिनिधिक स्वरूपात सर्वांकरिता केली. पैकी काही निवडक प्रातिनिधिक अनुभव तथा मनोगत आणि आपला अंनिससोबतचा प्रवास , अनुभव इत्यादी खालीलप्रमाणे.
👉 ज्येष्ठ अंनिस कार्यकर्ते आणि प्रथितयश आर्किटेक्ट प्रमोद सहस्रबुद्धे यांनी समाजावर चुकीच्या गोष्टींचा पगडा कसा बसतो ? याची उकल करताना आजच्याही युगातील माहितीच्या परिस्फोटाबद्दल थोडक्यात सांगितले. चुकीच्या गोष्टी कशा प्रसारित केल्या जातात आणि त्याबद्दल सांगताना पूर्वी त्यातील सत्यता पडताळून पाहण्याच्या मर्यादित सोयी असतानाही जागरूक नागरिक समाजसेवीजन प्रयत्नरत होते . मात्र आज computor तंत्र युगात उपलब्ध Fact Check करणाऱ्या अनेक संस्था आहेत ज्याद्वारे खरे खोटे उघड करता येते तरीही अज्ञानामुळे लोक सत्य असत्य पडताळून न पाहता अफवा पसरविण्याचे काम करतात. अनेकदा हे प्रकार सायबर क्राईम प्रकारात मोडू शकते.
👉ज्योती कांबळी यांनी आपल्या कर्मठ कुटुंबातील बालपणाचे वर्णन करताना. कुलदेवतेला जाताना तेथील भयंकर क्रूरता आणि किळसवाणा बळी विधी हा पाहून आपली होणारी दयनीय अवस्था माणुसकीवरून विश्वास उडविते.. हे स्पष्ट केले. Bright ह्या निरिश्र्वर वादी संस्थेच्या सभासदत्वाचा आणि अंनिसशी संबंध आल्यामुळे जीवनाची दिशा बदलली आहे हे स्पष्ट केले..
👉निवृत्त सुपरिंटेंडेंट न्यायपालिका, अजित डफळे यांनी अंनिसच्या पर्यावरणपूरक गणपती मूर्तींचे न्यायप्रविष्ठ प्रकरण अजूनही प्रलंबित आहे त्यावर काही योग्य निर्णय होत नाही याची आठवण करून दिली.. बाप्पा मोरया रे या गीताचीही आठवण करून दिली
👉 यानंतर थिराणी शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या धारडे मॅडम यांनी आपल्या नोकरीत असताना मुलांचे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे कार्य याची ओळख करून दिली. आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या कार्यात करून घेण्याबद्दल आवाहन केले. तसेच यासंदर्भात मदतीचा हात ही पुढे केला.
👉 यानंतर अरविंद तापोळे यांनी समाजातील असमानता दूर करणारे विचार यांचा उहापोह केला. अंधश्रद्धा विषयक विचार जीवनात अंगीकृत केले याचे उदाहरण म्हणून पुतण्याच्या विवाहोत्तर देवतेचा उपवास ठेवून लोटांगण घालण्याच्या प्रथेला आप्तस्वकियांच्या विरोधाला न जुमानता छेद दिला. अंनिस कार्यकर्ता म्हणून काम करताना नक्कीच बळ मिळते म्हणून हे प्रशिक्षण आवश्यक आहे अशा आशयाचे. मनोगतवजा भाषण केले.
👉यासोबत *समता विचारप्रसारक मंडळाच्या, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा जोशी* यांनी आणि सिद्धार्थ कांबळे यांनी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बहुस्तरिय मदतीच्या प्रयत्नांचे उदाहरण सांगत आपले मनोगत मांडले .
👉सामाजिक कार्यकर्ता विशाल जाधव यांनी दुर्बल घटकांमधील लहान मुलांचे दुर्लक्षित शिक्षण आणि आयुष्य यावर भाष्य करणारे गीत सादर केले. सोबतच कार्यकर्ता प्रशिक्षण विद्यार्थीदशेत होणे कसे आवश्यक आहे याचे महत्त्व मांडले.
👉कार्यकर्ता उदय छत्रे यांनी आपल्या सोसायटीतील वास्तूचे फॅड डोक्यात भरलेल्या मंडळींनी मांडलेला उच्छाद आणि त्यामुळे होणारा मनस्ताप व्यक्त केला..
👉 *भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने* अंनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला निर्मलाताई पोवार उपस्थित होत्या. त्यांनी आपले मनोगत मांडताना अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या सर्वात जास्त त्रासाला गृहिणींना तोंड द्यावे लागते . तसेच सामाजिक दुर्बल घटकांमधील महिलांची अवस्था तर आणखीही दयनीय असते.. अशावेळी अंनिसच्या कामामुळे खूप आशा निर्माण केली आहे असे भारावून जाऊन त्या बोलत होत्या. अंनिसचे आणि वंदना शिंदे ताईंचे या कार्यासाठी त्यांनी आभार व्यक्त केले ..
👉 आर्किटेक्ट शिवप्रसाद महाजन यांनी निरिश्र्वर वादाशी परिचय अल्पशा शब्दांत सांगून आपल्या व्यवसायात असणाऱ्या अंधश्रद्धा आणि त्यामुळे होणारे सामान्यांचे नुकसान यावर प्रकाश टाकला. या क्षेत्रात वास्तूशास्त्राचे माजलेले स्तोम याची उदाहरणे आणि असल्या गोष्टींशी आपला लढा याबद्दल सांगितले.. तसेच अशा तथाकथित वास्तूतज्ञाला निरुत्तर करणारी प्रश्नावली आपल्याकडून जरूर घ्यावी असे सांगून आपला मोबाईल क्रमांक सामाईक केला.
....या प्रवासात अद्यायावत माहिती संपादन करत व्यक्तीला अंनिस कार्यकर्ता बनण्याची प्रेरणा सहज मिळत जात होती. उपस्थितांचे आत्मविश्वास वृध्दींगत करणारा असा हा मनोगत-वजा चर्चात्मक आणि सकारात्मक कार्यक्रम उपयुक्त ठरला.
एकाच वेळी अनेक व्यवसायातील तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर एकच विचार मंचावर ऐकायला मिळाल्याने कार्यकर्ता प्रशिक्षणातील *विविध सामाजिक संस्थांची* त्यांच्या कार्याशी तोंड ओळख आणि अंनिसचे कार्य कसे सर्व सामाजिक संस्थांशी हातात हात घालून पुढे नेता येते त्याचे मूर्तिमंत उदाहरण पहिल्याच दिवशी मिळाल्याने नवीन सदस्य उत्साहाने मनापासून शिबिराचा लाभ घेत होते.
👉 मागील अनेक वर्षे मो ह विद्यालयातील वर्ग हॉल विनासायास अंनिसच्या उपक्रमास सहर्ष उपलब्ध करून देणाऱ्या आणि शिबिरास आवर्जून उपस्थित राहिलेल्या मो ह विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आणि शालासमूह प्रमुख राजपूत सर यांचे ऋणनिर्देश करून आभार मानले आणि पुस्तिकासंच भेट देऊन कृतज्ञता प्रकट केली. तसेच विद्यमान शालासमुह प्रमुख मा. मेटकरीसर यांचेही माईंनी पुस्तिकासंच भेट देऊन सत्कार केला.
👉 *राजपूत सर यांनी अंनिस ठाणे शहर अध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे यांचा शाल भेट देऊन सत्कार केला. आपले मनोगत प्रकट करताना सरांनी खूप आठवणी, अनुभव सांगितले. अंनिसच्या कृतिशील कार्यक्रमांचा सरांनी गौरव केला. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही कसे सामाजिक कार्य करत राहता येऊ शकते याचे काही दाखले त्यांनीं दिले. यापुढेही काही सहकार्य लागल्यास ते देण्यास आपण तयार आहोत असे वचन राजपूत सरांनी दिले..
👉 या शिबिरास सहकार्य करणाऱ्या आणि आपले कार्य पुढे सुरू ठेवणाऱ्या अध्यापक मोरे सरांचे राजपूत सर आणि मेटकरी सरांनी शाल भेट देऊन सत्कार केला.
👉🙏सकाळ सत्राखेर आपले विचार प्रकट करणाऱ्या योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे माईंनी आभार प्रकट केले .. अंनिसच्या विस्तृत कार्यक्षेत्राची थोडक्यात ओळख करून देत असताना कुठेही क्लिष्टपणा राहणार नाही याची माईं आणि अँब्रोस यांनी पुरेपूर काळजी घेतली .
🌺*मध्यान्ह भोजन अवकाश*🌺
पुष्पाताई आणि अरविंद तापोळेसर आणि हेमाताई यांनी सर्वांना रुचकर भोजन दिले.
🍁*दुपार सत्र*🍁
👉 *चतु:सुत्रीची ओळख*
*विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे छोटेखानी मार्गदर्शन येथे ठेवण्याचे कारण स्पष्ट करताना *"विविधता आणि प्रेरणा तसेच अंनिसच्या चतुसुत्रीचा महत्वाचा भाग"* असे अँब्रोस यांनी सांगीतले. यानंतर माईंनी अंनिसच्या चतु:सुत्रीची ओळख करून दिली.
👉 *चमत्कार प्रात्यक्षिक*
प्रेक्षक डोक्यावर घेतात असा खिळापाटाचा प्रयोग स्वतः माईंनी प्रथम भाग घेऊन सादर केला त्यानंतर अनेक सदस्यांनी बहुश: महिलांनी भाग घेतला आणि अर्चना आहेर या नवीन तरुण सदस्या यांनी सादरीकरणात शेवट पर्यंत सहकार्य केले. या प्रसंगी संविधानाचा, सावित्री बाई फुले, महात्मा फुले, डॉ आंबेडकर, महीलाशक्तीचा जयघोष करण्यात आला.
वातावरणात उत्सुकता कुतूहल याकडून आत्मविश्वासपूर्ण असा बदल झाला.
👉यानंतर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर या मुख्य विषयावर आपले मार्गदर्शन देण्याकरिता प्रमुख पाहुणे डॉ नितीन जोशी यांना माईंनी मंचावर आमंत्रित केले.
🏵️👉*प्रमुख पाहुणे डॉ नितीन जोशी यांचे व्याख्यान*
यांची माईंनी थोडक्यात ओळख करून दिली आणि डॉक्टरांनी त्वरित व्याख्यानास सुरुवात केली. *आपली अंनिसशी ओळख तीन दिवसीय निवासी शिबिरातून झाली असे सांगितले.. आणि भारावून जाऊन आपण काम सुरू केले असे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्य आणि विचाराचे महत्त्व पटत गेल्याने स्वतःच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाले असे त्यांनी सांगितले आपले लग्न अवघ्या 32रुपयात आपण कसे केले आणि आप्त स्वकियांना सर्वांचा विरोध ओढवून घेत सत्यनारायण घातला नाही हेही सांगितले मात्र आप्त स्वकियांना घरी जेवणास आमंत्रण होते परंतु सत्यनारायण घातल्या शिवाय कोणी जेवायला ही येत नसतात हे ही त्यांना सांगितले गेले.. असो , असा अनेकांचा विरोध पचवून त्यांनी आपल्या व्यवसायासोबत हे सामाजिक सेवाकार्य अनिवार्य मानून सुरू ठेवले. हजारो किलोमीटर दूरवरच्या मंगळाला आपल्या आयुष्यात काय रस असेल ? असे अधून मधून हलके फुलके विनोद पेरत कार्यकर्ता प्रशिक्षणाच्या आवश्यक पायऱ्या विषद केल्या. शेवटी डॉ नितीन जोशी यांनी प्रश्नोत्तरांसाठी ही वेळ दिला. नवीन सदस्यांनी आपले प्रश्न मांडून त्याचे निराकरण करून घेतले. *उत्तरोत्तर हे प्रशिक्षण आपण रीतसर घेतलेच पाहिजे हेच ह्या एकदिवसीय शिबिरातून पक्के होत जात होते.* माईंनी काही प्रश्नांना अधिक स्पष्ट करत जमेल तसे शाखेच्या पाक्षिक बैठकीस उपस्थित राहून सतत माहिती अद्ययावत करत राहण्याचे आवाहन केले.. आणि आपल्या व्यस्त व्यवसायातून वेळ काढून अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरक व्याख्यान दिल्याबद्दल डॉक्टर नितीन जोशी यांचे आभार मानले..
*यादरम्यान चहापानाची व्यवस्था झाली*
👉*आवाहन*
याच वेळी वार्तापत्राबद्दल माहिती देऊन सदस्यत्वाचे आवाहन अँब्रोस चेट्टियार यांनी केले आणि आपण सोबत आणलेल्या काही अंकांचे नवीन सदस्यांसाठी भेट म्हणून वितरण केले..
त्यानंतर मानवाला सदैव आकर्षण राहिलेल्या आकाशातील ग्रह तारे आणि आपण ' या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी प्रा. पारखे यांना मंचावर आमंत्रित केले गेले.
🏵️👉 *प्रा. पारखे यांचे व्याख्यान*
यानंतर आकाशस्थ ग्रहतारे यांची स्थिती, वार, महिने, राशी, नक्षत्र, त्यांचे भ्रमणमार्ग यांचे भारतीय आणि पाश्चात्य देशातील तुलनात्मक शास्त्र आणि त्याबद्दलच्या जनमानसात पसरलेल्या वा पसरवल्या गेलेल्या अंधश्रद्धा यावर बोलताना प्रा. पारखे सर यांनी हाती काही साधन सामुग्री नसतानाही अत्यंत मनोरंजक पद्धतीने भरदिवसा बंदिस्त वर्गात आकाश दर्शन घडवले. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही अनुभव सांगताना समाजातील अंधश्रद्धांना तोंड देत आपले सामाजिक कार्य पुढे सुरू ठेवण्याचे बल आणि रहस्य म्हणजे कुटुंबाचे सहकार्य असे सांगितले. आपल्या कुटुंबाचे सहकार्य याबद्दल आपल्या आभारयुक्त भावना सादर व्यक्त केल्या..
🌺🙏*आभार* 🌺🙏
वेळात वेळ काढून आवर्जून कार्यक्रमास आलेले मान्यवर व्याख्याते डॉ नितीन जोशी सरांचे आणि प्रा. पारखेसरांचे माईंनी आभार मानले.. तसेच सर्व उपस्थित सदस्य व नवीन सभासद यांचेही माईंनी मनःपूर्वक आभार मानले.
🙏🙏🙏🙏🙏
🍁 *समापन* 🍁
🙏कार्यकर्त्यांचे आभार🙏
👉*नोंदणी , पुस्तक प्रदर्शन आणि विक्री विभाग - अजित डफळे आणि हेमलता रामचंद्रन मॅडम ..
*एकूण 4 पुस्तिकासंच यांची शिबिरात विक्री झाली.
*नोंदणी आणि पुस्तक विक्री विभागाचे अभिनंदन आणि आभार 👏👏👏
👉*भोजन विभाग पुष्पाताई तापोळे, अरविंद तापोळे आणि हेमलतामॅडम, उत्स्फूर्त सहकार्य प्रियंका पारखे भोजन विभागाचे आभार
👉*सूत्रसंचालन अँब्रोस चेट्टियार
👉*चळवळ गीत - अँब्रोस चेट्टियार, कल्पना चेट्टियार, पुष्पाताई ज्योतीमॅडम, हेमलतामॅडम. चळवळ गीत विभाग आभार
👉*चित्रीकरण - नितीन भवर
नितीन भवर यांचे आभार
👉*कार्यक्रम स्थळ चहा आणि पेय जल व्यवस्था - महादेव मोरे सर . महादेव मोरेसर यांचे आभार.
👉 *अत्यंत खास आणि विशेष विशेष उल्लेख* - कार्यक्रमाची प्रसिद्धी, पाठपुरावा आणि इतर सहाय्य, अंनिसच्या कार्याच्या जबाबदाऱ्या सहर्ष, प्रसन्नवदने, तत्परतेने पार पाडणारे *ज्येष्ठ कार्यकर्ते, पाठीराखे अशोकदादा चव्हाण* यांचे खास खास आभार
🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
👉🙏अँब्रोस चेट्टियार यांनी कार्यकारी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आणि सर्वात महत्वाचे सर्वांना प्रेरणादेणारे डॉ दाभोलकरांचे महान कार्य पुढे नेण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या माई वंदना शिंदे यांचे अनंत आभार व्यक्त केले🙏
अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात शिबिर सफल झाल्याचे पाहून कार्यकारी मंडळास आपल्या मेहनतीचे चीज झाल्याचे जाणवत होते. सर्वांच्या चेहेऱ्यावर समाधान होते. या संदर्भात अभिप्राय दाखल प्राप्त झालेले अंनिस सदस्य उदय छत्रे यांचे वचन बोलके आणि अंनिस ठाणे करिता गौरवाचे आहे .
** *उदय छत्रे यांचे अभिप्राय >>> It was the best workshop done..
Including
Arth chamtkarache
Lectures from Dr joshi
Lecture from prof Prakash Parakhe
👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾 <<<
कार्यकर्ता उदय छत्रे यांचे ☝️या अभिप्राया करिता विशेष धन्यवाद 🙏
यानंतर कार्यक्रम संपन्न संविधान वाचनाने होईल असे जाहीर केले.
🙏*समापन* 🙏
आपल्या भारतीय संविधानास मानवंदना देण्यासाठी, त्याचे वाचन करण्यासाठी संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, काही क्षण उभे राहण्याचे आवाहन केले गेले. संविधान रक्षणाचीही जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे आपण जागरूक राहून संविधानाचे रक्षण करण्यास सिद्ध होऊन आपल्याने जे काही शक्य होईल ते किमान आपल्या स्तरावर तरी जरूर करावे. या विचारासोबतच माईंनी संविधानाचे सामूहिक वाचन घेतले.. त्यानंतर शिबिराचे रीतसर समापन झाले असे जाहीर केले..
धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा