पा बैठक वृत्त रवि दि : 29 10 24

 


*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,  ठाणे शहर शाखा*

पाक्षिक बैठक वृत्तान्त
रविवार, दिनांक : 29 सप्टेंबर 2024
विषय चर्चा :-
👉 एक
ठरलेल्या विषयांपेक्षा आठवड्याभरातील अनेक घडामोडी यांची चर्चा आणि त्यावरील पुढील तातडीचे पाऊल हा विषय जास्त वेळ चर्चेला असल्याने ठरलेले विषय वगळण्यात आले.
पैकी मुंबईच्या एका सुखवस्तू व्यावसायिक कुटुंबाने आपल्या मूळ गावी असलेल्या कोट्यावधींची चलअचल संपत्तीची प्राप्ती व्हावी या लालसेने त्यांच्या समाजात विख्यात अशा एका भोंदूच्या नादी लागून विविध प्रकारचे उपाय करण्यात जवळ जवळ अडीच कोटी रुपये उडवले. आणि आता ती संपत्ती तर मिळत नाहीच तर ते पैसे मिळावे अशी त्यांची अशा आहे पण ते समोर येत नाहीत. मात्र पोलिसांनी व ईतर सामाजिक संस्थांनी त्यांना ते मिळवून द्यावे अशी त्यांची इच्छा आहे. गडगंज पैसा असलेले हे लोक स्वतः चुका करतात आणि ईतर सर्वांना वेठीस धरतात.  आपल्याला त्यांच्या कडून तशी लेखी तक्रार येईपर्यंत आपण त्यात लक्ष घालणे सयुक्तिक ठरणार नाही.. परंतु प्राथमिक स्तरावर हे प्रकरण आपल्याकडे आले होते .. परंतु माईंनी त्यांना संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यात त्या लोकांकडून सहकार्य मिळत नसल्याने सध्या तो विषय तेवढ्यावरच थांबलेला आहे..असो.
👉 दुसरे
जटाधारी स्त्रीच्या जटा संबंधी क्या गैसमजातून बाहेर काढणे हे मोठे जिकिरीचे काम असते. तिचे नीट councelling करून जटा निर्मूलनाचे काम लवकरच करायचे आहे असे माईंनी .. माहिती देताना सांगितले..
👉 उपस्थित कार्यकर्ते, माई , राहुल शिंदे , अथर्व , पुष्पाताई, कल्पना आणि अँब्रोस ..  पैकी  राहुल यांच्यामते मॅड सखाराम हे नाटक आपण लावावे का ? जेणेकरून संघटनेला काही आर्थिक प्राप्ती होऊ शकेल .. असा विचार मांडला ..परंतु सर्व मुद्द्यांच्या विचाराअंती सध्या ते आलं टाळत आहोत..
तसेच दुसरे काही तरी शैक्षणिक कार्यक्रम, स्पर्धा स्वरूपात घेता येईल का त्यातील विजेत्यांचे मार्फत आणखी थोड्या अधिक लोकांपर्यंत आपले कार्य नेता येईल असा विचार झाला . आणि हे कार्य आपण करायचे या बाबतीत शिक्कामोर्तब झाले..  विषयाच्या विविध अंगांनी विचार होऊन तयारी सुरू करण्याचे ठरले.
👉कौतुक
महिला फेडरेशन तर्फे ५० महिलांना संसारोपयोगी वस्तूंचा संच वितरीत करण्यात आला त्या कार्यक्रमाची माहिती माईंनी दिली आणि प्रातिनिधिक स्वरूपात भारतीय महिला फेडरेशनच्या पदाधिकारी असलेल्या आपल्या अंनिसच्या सक्रिय कार्यकर्त्या पुष्पाताई यांचे अभिनंदन करून कौतुक केले..
यासोबत बैठक संपन्न झाली..

पुढील बैठकीचे नियोजन लवकरच कळवण्यात येईल.

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,  ठाणे शहर शाखा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी