शब्दवृत्त पृष्ठ 3
शब्दवृत्त पृष्ठ 3
पुढे सुरू..
*प्रथम सत्राचे समापन*
अध्यक्षीय भाषण
माननीय पूर्वन्यायाधीश डी. जी. पारीख
प्रथम सत्राचे समापन माननीय न्यायाधीश डी. जी. पारीख यांच्या भाषणाने झाले. ओळख करून देताना न्यायमूर्ती असा उल्लेख झाल्याने त्यांनी स्पष्ट केले की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना न्यायमूर्ती म्हटले जाते आणि आम्ही सत्र न्यायालयाचे असल्याने आम्हाला न्यायाधीश म्हटले जाते. असो. मला न्यायाधीश वगैरे म्हणवून घेताना खूप संकोच वाटतो. कारण आम्ही न्याय करत नाही तर फक्त निकाल देतो. म्हणून आम्हाला निकालाधीश म्हणणेच योग्य ठरेल. पूर्व न्यायाधीश डी जी पारीख सर बोलत असताना सर्व लक्षपूर्वक ऐकत होते. अनेक गोष्टींवर भाष्य करत त्यांनी सांगितले की आजच्या जगात कदाचित दाभोलकरांच्या कार्याचे यथोचित मूल्यांकन होत नाही असे दिसते. त्यांचे आयुष्य आणि कार्य यांची तुलना महात्मा जोतिबांच्या कार्याशी करता येईल इतके अफाट कार्य ते करून गेले आहेत.
दाभोलकरांना लोकांचा विरोध का ? तर त्या लोकांना अंधभक्त बनवता येत नव्हते. असे नेमके वर्मावर बोट ठेवत ते म्हणाले.
प्रमुख पाहुण्यांचे भाषण हे अतिशय माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक होते. मी ऐकत होतो आम्ही बोलतो कमी ऐकण्याचेच आमचे काम असते. असे अधून मधून हलके फुलके विनोद पेरत धीर गंभीर चेहेऱ्याचे न्यायाधीश बोलत होते आणि सभेत स्मित हास्य ही निर्माण करत होते. तसेच संपूर्ण आयोजन हे खूप कौतुकास्पद आहे असे न्यायाधीश म्हणाले. सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून लेखन कार्यशाळेला खूप शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्य करण्यासोबत त्याची माहिती जतन व्हावी म्हणून लेखन हे आलेच. अशा महत्वपूर्ण लेखनासंबंधी कौशल्ये प्राप्त करण्यासाठी असे आयोजन आवश्यक आहे. आणि ते हेरून अंनिस - अंनिवाने तो मंच आपणासर्वांना उपलब्ध करून दिला आहे त्याचा सर्वांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा. सर्वांना कार्यशालेकरिता शुभेच्छा देऊन न्यायाधीश डी जी पारीख यांनी आपले अध्यक्षीय भाषण आवरते घेतले.
पृष्ठ 3. ......क्रमशः....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा