पाक्षिक बैठक वृत्तांत
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
*पाक्षिक बैठक वृत्तांत*
आज रविवार दिनांक 08सप्टेंबर 2024रोजी.
सायंकाळी 05 वाजता सुरू झालेल्या बैठकीत...
दिनांक 01 सप्टेंबर 2024रोजी संपन्न झालेल्या शिबिरास उपस्थित नव्या जुन्या सदस्यांच्या उपस्थितीत आजची बैठक झाली ..
*उपस्थित सदस्य*
माई वंदना शिंदे ,
समीर शिंदे ,
राहुल शिंदे,
अथर्व लिपारे ,
अँब्रोस चेट्टियार,
किरण चव्हाण ,
नितीन भवर,
उदय छत्रे,
आणि अजित डफळे इ कार्यकर्ते उपस्थित होते..
*सर्व प्रथम
.👉उपस्थित सदस्यांची ओळख, पत्त्ता आणि शिबिरास येण्याचे प्रयोजन आणि शिबिरातील अनुभव सर्वांनी सांगावे असे आवाहन ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे अंनिस ठाणे शहर शाखा अध्यक्ष यांनी केले.
.👉त्यावेळी सर्वप्रथम राहुल शिंदे IT मध्ये पारंगत असून अनेक अनुभव थोडक्यात मांडताना अंनिसमध्ये आल्यावर समविचारी लोकांमध्ये आल्या सारखे आणि खूप बरे वाटते आहे..आता काही सामाजिक काम आपण कृतिशीलतेने करू शकू असे मांडले..
.👉 त्यानंतर प्राचार्य किरण चव्हाण कन्याशाला ठाणे यांनी आपले वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त आपले बालपण तारुण्य आणि विज्ञान शाखे साठीचा ओढा तसेच करणी मधील अंडी फोडून पिणे, स्मशानात मर्त्याच्या अग्नीदहनानंतर जनावरांनी प्रेत पळवू नये म्हणून मित्रांसोबत केलेल्या जागरणाचा किस्सा सांगून शालेय मुलांपर्यंत पोहोचण्याची उत्तम संधी चमत्कार आणि विज्ञान कार्यक्रमातून मिळेल आणि काही समाजोपयोगी असे काम करता येईल..म्हणून माईंच्या प्रेरणेने अंनिस शिबिर केले. असे सांगितले
.👉 यानंतर उदय छत्रे यांनी थोडक्यात आपले प्रयोजन आणि अनुभव सांगितले सोमैया कॉलेजातील निखाऱ्यावरून चालण्याच्या प्रात्यक्षिकापासून अंनिस बरोबर संबंध आले तत्पूर्वी त्यांचे वडीलही अंनिस कार्याशी संलग्न होते असे त्यांनी सांगितले.. अंनिसची अशी काही प्रार्थना आहे का अशी विचारणाही केली. तर आपली शालेय प्रतिज्ञा आणि संविधानाचे प्रास्ताविक वाचन असे आपण करावे असे सुचवले गेले ..
.👉 नितीन भवर यांनी आपली कार्य पद्धती कशी असावी यावर चर्चा केली ,
.👉समीर शिंदे यांनी या पुढे कार्य कोणत्या पद्धतीने व्हायला हवे यावर चर्चा केली..
.👉 अथर्व लिपारे यांनी आपण सोशल मीडिया हे तंत्र वापरून करता येऊ शकेल अशा गोष्टींची चर्चा केली.
अजित डफळे , माई वंदना शिंदे आणि अँब्रोस चेट्टियार..इत्यादी सर्वांनी आपले अनुभव थोडक्यात मांडले..
.👉या प्रसंगी नवीन तंत्राचा वापर करून आपल्या कार्याला नवीन दिशा देण्याकरिता काय करता येईल असे विषय चर्चेला होते. त्याबद्दल अनेक मुद्दे मांडले गेले. ज्यातील काही मुद्द्यांवर लवकरच काम सुरू होईल..
.👉 शाळांमधून घेण्यात येणारा कार्यक्रम आपण लवकरच आखून तोही येत्या आठवड्यात सुरू होईल..व त्यात ठरलेल्या काही सूचनांचा नक्की वापर करता येईल हे ही ठरवण्यात आले.
.👉 येत्या शनिवार आणि रविवार म्हणजे 14 आणि 15 सप्टेंबरला साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक वडघर माणगाव येथे अंनिस च्या सभासदांसाठी एक लेखन कार्यशाला आणि काही निवडक सदस्यांचा सत्कार असा कार्यक्रम होईल त्या करिता इच्छुक सदस्यांनी वडघरला येण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे* अशी सूचना देऊन सदर कार्यशाळेला येण्याचे आवाहन अध्यक्षांनी केले.
👉या प्रसंगी
*बाप्पा मोरयाला गणरायाला निरोप देऊया त्याला ..*
हे पाणी प्रदूषण टाळण्या करिताचे 2004, मध्ये रचलेले शाहीर एस एस शिंदे यांचे गीत सर्वांनी गायिले..
.👉 माईंनी नवीन संचातील पुस्तिकांपैकी एक उतारा वाचला.. सर्व पुस्तके वाचण्याचा आवाहन केले राहुल शिंदे यांनी सदर पुस्तिका इतरांना भेट म्हणून देण्याचा विचार करत आहे असे सांगितले... अनेक प्रश्नांची उत्तरे आणि नवी तंत्राची आपल्याकरिता उपयुक्तता अशा चर्चेत मीटिंग सायं05: 00ते सायं8:30 अशी चालली ..
.👉 *पुढील बैठक ही 22 सप्टेंबरला सायंकाळी 05वाजता होईल असे निश्चित झाले आहे..त्याकरिता नक्की वेळ राखून ठेवा..*
.👉 याबद्दल आपले अभिप्राय कॉमेंट जरूर करावे.. .👉पुढची मीटिंग खालील पत्त्यावर माईंच्या घरी होईल..
Mrs. Vandana S. Shinde,
B-701, Ganaraj Heights,
Nxt. to Mahavir Milestone,
Behind Vikas Complex “A” phase,
Nr. Adarsh Nagar,
Off Comrade Rajaram Rawool marg,
Kolbad, Thane (w) 400601
संपर्क: माई , वंदना शिंदे,
9869151679
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा