रितेपण

 

रितेपण....

ऐकुनी कथा तुमच्या साऱ्या
धार डोळ्याला लागते माझ्या
तुमचा तो चिऊ काऊ बुबु भाऊ गमजा
मजला न उमजे माझा कोण राजा ... हां sss ऐकुनी ..

रिते घर अंगण, रिते मन दर्पण
आसावते ऐकुनी हळहळते मन...
सान गुजगोष्टी नाही आम्हा असे नाही
आपुले म्हणावे पण मात्र असे कुणी नाही ...हो sss ऐकुनी..

बाललीलांची कथा रंगलेली श्रवणी
ऐकण्यात हरवून जाते मन माझे सर्वदा
येता कुशीत कोणी बाल ते रमते
खेळ खेळून दमते आणि परतते
हिरावून नेते बाल्य सर्वस्व माझे
माझ्या कडे न मीच उरते मागे येथे.. हांssऐकुनी

मागणे लाभे सर्वा सुखाचे सागर
नांदो सुखे घरकुल प्रेमे अपार
रमते मी माझिया फुला नी पानांत
सर्व काही राही खोल आकंठ हास्यात ....हो ssऐकुनी

ऐकुनी कथा तुमच्या साऱ्या
धार डोळ्याला लागते माझ्या
तुमचा तो चिऊ काऊ बुबु भाऊ गमजा
मजला न उमजे माझा कोण राजा ... हां sss ऐकुनी ..
       *©अँब्रोस चेट्टियार*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी