शब्दवृत्त पृष्ठ. २
शब्दवृत्त पृष्ठ. २
👉प्रथम सत्र :-
स्वागत आणि सूत्रसंचालन:- राहुल थोरात.
.... कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी सर्व उपस्थित मान्यवर कार्यकर्ते आणि निमंत्रितांचे स्वागत केले. आणि प्रथम सत्राकरिता विचार मंचावर अध्यक्ष म्हणून पूर्वन्यायाधीश मा. जी डी पारीख सर , प्रमुख वक्ते साधना संपादक मा. विनोद शिरसाठ सर, अंनिवा संपादक मा. राजीव देशपांडे सर, प्रख्यात विचारवंत, बालसाहित्यकार मा. राजीव तांबे सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. भाऊ सावंतसर आणि ज्येष्ठ अंनिस कार्यकर्त्या माई, मा. वंदना शिंदे यांना विचार मंचावर पाचारण केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे सूत्रसंचालक राहुल थोरात यांनी माननीय सक्रीय सदस्यांकरवी पाहुण्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
🙏🙏🙏🙏
👉काही दिवसांपूर्वीच समाजाने आणि अंनिसने आपले समाजाभिमुख कार्य करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते गमावले त्यांच्या स्मरणार्थ आदरांजली म्हणून सर्वांनी एक मिनिट स्तब्ध उभे राहून शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात आले तसे सर्वांनी उभे राहून आदरांजली वाहिली.
🙏🙏🙏🙏🙏
*प्रास्ताविक*
👉त्यानंतर अंनिवा संपादक राजीव देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी या द्वीदिवसीय कार्यक्रमापैकी प्रथम दिवसाच्या लेखन कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे केवळ पत्रिकाच नाही. तर सामाजिक लढा लढत असताना, कार्यकर्ते तयार करणारे ते एक साधनही आहे. पण त्याहून महत्वाचे हे की या आंदोलनात नेमकेपणाने काय नी कसे घडले याची माहिती नोंदविणारे आणि त्याच वेळी जगालाही माहिती पुरविणारे प्रबळ साधन आह '. असे सांगितले. आणि अशाप्रकारे ' खऱ्याअर्थाने अंनिवा हे, म.अंनिस संघटनेचे मुखपत्र आहे '. असे उद्गार काढले. 'संघटनेचे मुखपत्र आणि आजच्या समाजातील प्रस्थापित प्रसार माध्यमे यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे' असेही नमूद केले. प्रास्ताविक माहिती दिल्यावर 'कार्यक्रमाध्यक्ष मा. न्यायाधीश, डी. जी. पारीखसर आणि आजचे प्रमुख वक्ते साधना संपादक विनोद शिरसाठ, हे कार्यशाळेचे उद्घाटन करतील' . असेही जाहीर केले.
*पाहुण्यांची ओळख*
👉यानंतर अंनिस कार्यकर्त्या रुपाली आर्डे यांनी मान्यवर अध्यक्ष पूर्व न्यायाधीश जी डी पारीख सर आणि प्रमुख पाहुणे विनोद शिरसाठ यांची ओळख करून दिली.
*उद्घाटन*
*दाभोलकर घरोघरी* पुस्तिका लोकार्पण
👉 संपादक राहुल थोरात यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन स्वरूप डॉ दाभोलकर घरोघरी या पुस्तिका मालेतील द्वितीय पुस्तिका संचाचे लोकार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन, प्रमुख पाहुणे अध्यक्ष आणि मंचासीन मान्यवरांनी करावे अशी विनंती केली. त्यानुसार मंचासीन अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवर पाहुणे यांनी पुस्तिकांचे लोकार्पण केले.
*प्रमुख वक्त्यांचे भाषण*
*शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे शब्दस्मारक*
👉 प्रमुख पाहुणे साधना संपादक विनोद शिरसाठ यांनी डॉ दाभोलकर यांच्या लेखनातून आपण काय शिकायचे ? त्यांनीं या विषयावर आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून विषय प्रतिपादन केले.
🌸लेखन कार्यशाळांची गरज दिवसेंदिवस वाढत असून आव्हाने आणि संधीही त्याच प्रमाणात वाढत आहेत असे सांगितले. म्हणूनच लेखन कार्यशाळा तसेच या संदर्भात Research आणि ट्रेनिंग होत राहणे आवश्यक आहे असे सांगितले.
🌸आपली डॉक्टरांशी पहिली भेट 5 जानेवारी 2004 रोजी झाली आणि ती अत्यंत नाट्यपूर्ण ठरली असे त्यांनी सांगितले.
🌸 त्याबद्दल थोडक्यात सांगताना विजय तेंडुलकरांनी 2003 मधे स्फोटक विधाने केली होती. त्यावेळी लिहिलेला तीनपानी लेख शिरसाठांनी साधनेला पाठविला होता.
🌸तो *डॉक्टरांनी साधनेत छापला. आणि शिरसाठांना तीन वाक्यात अभिप्राय दिला. की
*एक या तीन पानांच्या लेखातून तुमचे वाचन-लेखन कळते, समजते.
*तसेच दोन , कठोर टीका करतानाही भाषा कशी सभ्य ठेवता येते ते समजते.
🌸*आणि तुमच्या विचारांची दिशा योग्य आहे. या तीन वाक्यांनी शिरसाठांचे आयुष्य बदलले. त्यानंतर ते पुढे साढे नऊ वर्षे डॉक्टरांच्या सानिध्यात होते. तयार होत होते..*
🌸त्यांनी पुढे सांगितले की 'डॉक्टर 45 वर्षे लिहीत होते. परंतु डॉक्टरांच्या चाळिशी पर्यंतच्या आयुष्याला सखोल पाहिल्या शिवाय एवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व कसे काय निर्माण झाले हे समजणे केवळ अशक्य आहे' असे ते म्हणाले. आणि त्यापुढे डॉक्टरांच्या आयुष्यातील खूप गोष्टी सांगितल्या आणि खूपशे संदर्भ शिरसाठांनी दिले.
🌸डॉक्टर शासकीय वैद्यकीय अधिकारी होते,
🌸पूर्व कबड्डीपट्टू होते आणि सामाजिक कार्यात झोकून काम करणारे कार्यकर्तेही होते.
🌸त्यांच्यावर गांधीजींचा खूप प्रभाव होता. समाजातील विषमता त्यांना अस्वस्थ करी.
🌸त्यांनी दलितांसाठी सवर्णांबरोबर संघर्ष केला.
🌸रेशनचा काळाबाजार उघडकीस आणला.
🌸त्यांनी पहिला लेख 1971-72 सालीच लिहिला होता.
🌸प्रत्यक्ष कामातून अनुभवातून त्यांचे लेखन होत असे. असे प्रत्यक्ष कार्यातील अनुभवातून, अभ्यासपूर्ण एकूण 18 लेख
🌸आणि क्रीडांगण विश्व , माणूस असे चळवळीच्या आघाडीवरून त्यांनी शेकडो लेख लिहिले.
🌸डॉक्टर 1970 साली एमबीबीएस झाले होते.
🌸ज्ञात अज्ञाताच्या सीमा रेषेवरुन* याच विचाराच्या जवळपास कुठेतरी कदाचित अंनिसच्या कामाचे बीज रुजले असावे.
🌸तसेच 1981 चा लेख राष्ट्र सेवादल, युवक, विचार आणि व्यवहार . हा त्यांच्या सामाजिक कार्याच्या पंक्तीतला लेख म्हणजे सेवादलाला आत्मपरीक्षण करायला सांगणारा लेख होता. तसेच 1982 चे लेखन आणि कार्य .. असे डॉक्टरांचे कार्य अव्याहत सुरूच होते.
🌸अन्यायाचा जमेल तेवढा तीव्र प्रतिकार करायला हवा. असे डॉक्टरांचे म्हणणे होते. डॉक्टर अंनिसच्या जन्माच्या खूप आधीपासून साधारण 1972 पासून *समता-संगर* असा शब्द प्रयोग करत होते.
🌸 2006 चा लगे रहो मुन्नाभाई बद्दलचा विनोदजिंचा ' चित्रपटात गांधीगिरी सोपी असते असे दाखवले गेले आहे पण प्रत्यक्षात मात्र तसे नसते' असा अभ्यासपूर्ण अभिप्राय डॉक्टरांना मिळाला . ईतर कोणीही मान्यवर त्यावेळेला चित्रपटाचे इतके अचूक समीक्षण केलेले त्यांनी पाहिले नाही.. विनोदजिंच्या मुखी डॉक्टरांचे विचार त्यांना मिळत होते इतके वैचारिक पातळीवर दोघांचे ऐक्य आपसूक दिसून येते हे सांगताना विनोजिंना आतून समाधान वाटत होते हे त्यांच्या बोलण्यातून समजत होते. त्यांनी चित्रपट पाहिला नसला तरी गांधीजीं बाबतचा त्यांचा अभ्यास किती पक्का होता हे ही स्पष्ट होत होते.
🌸डॉक्टरांची निवड कशी सर्वथा सार्थ ठरत होती आणि हे पाहून डॉक्टरांना होणारे समाधान ही व्यक्त होत होते. त्यानंतर होणाऱ्या चर्चांमध्ये डॉक्टरांनी विनोदजिंचे हे वक्तव्य जसेच्या तसे पुढे केले होते. कारण ते योग्य होते आणि त्यांच्या मनातलेही होते. (साधनेसाठी विनोद शिरसाठ यांची विचारपूर्वक निवड करून संपादकपदी त्यांची वर्णी डॉक्टरांनीच पद्धतशीरपणे लावल्याने शिरसाठांना संपादकपद निभावताना वेगळे असे आव्हान उभे राहिले नसावे. वा त्यांचा पुढील मार्ग तसा तुलनात्मकदृष्ट्या किमान जिकिरीचा राहिला असावा. अर्थात विनोद शिरसाठांचे गुणही महत्वाचे आहेत त्यामुळेच डॉक्टरांच्या नजरेत ते आले. हे ही तितकेच खरे. असेच त्याच्या ह्या व्याख्यानातून जाणवत होते.)
🌸 शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना याबद्दलही असेच त्याबद्दल विचारले असता ही कर्ज माफी नसून क्षमायाचना आहे कर्ज माफी योजना ही क्षमा याचना माफी योजना आहे शेतकऱ्यांसाठी काहीच करता आले नाही ही खंत या योजनेतून स्पष्ट होते असे विचार .
🌸 काळाच्या पुढे साधनाची website निर्माण केली गेली. वृत्तव्यवसाय क्षेत्रातील अशी ही पहीलीच घटना होती.
🌸प्रत्यक्ष कामातून आणि अनुभवातून आलेली अंनिस संबंधीची 12/15 पुस्तके लेखन आणि कार्यातून जनजागृती . या साहित्यातून भारतीय संविधान आणि गांधी यांच्या बाबत प्रचंड आस्था आणि कुतूहल डॉक्टर व्यक्त करतात ..
🌸 डॉक्टरांची सतत नवनवीन गोष्टी शिकत राहण्याची कला आणि वृत्ती.
🌸जबरदस्त convincing Power इत्यादी डॉक्टरांचे बलस्थान होते.
🌸कार्यकर्त्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबतीत प्रचंड काळजी करणारे डॉक्टर जेव्हा त्याबद्दल बोलतात लिहितात. तेव्हा प्रतिसाद म्हणून आलेल्या पत्रातून संवाद साधत त्यावेळी 'डॉक्टर स्वतः कशी आरोग्याबाबत सुरक्षेबाबत निष्काळजी आहेत किंवा हेळसांड करून प्रचंड कामाचा व्याप मागे लावून घेत आहेत ' असा चिंतेचा सहज सूर आलेल्या पत्रातून मांडला गेला होता ज्याचा आदरपूर्वक परामर्श घेऊन डॉक्टरांनी त्यांना कामाच्या अपरिहार्य व्यापामुळे सहज शक्य नसला तरी सर्वांना आदर्श घालून दिला. ते पत्र डॉक्टरांचे चिरंजीव हमीद यांचे होते. असे सर्वांना सहज माहिती नसणारे अनुभव मांडत विनोद शिरसाठ कार्यकर्त्यांच्या हृदयाचा ठाव घेत होते.
🌸शेवटची 15वर्षे विचार आणि कृती यातील पूल बनून, डॉक्टर साधनेत संपादक म्हणून अव्याहत कार्य करत होते. अविरत अग्रलेख लिहिणे. हे सुरूच होते. एखादा उत्तम विचार मिळाला तर तो पारखून उचलून धरणे, नको असलेले सहज त्यागणे डॉक्टरांना लीलया जमत असे.
🌸असे अनंत गुण असलेल्या डॉक्टरांकडून शिकण्यासारखे आणखी बरेच आहे म्हणजे
*वेळेचे उत्तम व्यवस्थापन.
*उपलब्ध वेळेत उत्कृष्ट तयारी
*उत्तम विषय प्रतिपादन..इत्यादी अनेक गुणांपैकी एक थक्क करणारा गुण म्हणजे कोणी मुलाखतीला आले तर मुलाखतकार बोलत 'डॉक्टर तुम्ही बोला ', तर डॉक्टरच त्यांना विचारत ' तुमच्याकडे किती वेळ आहे ते सांगा म्हणजे मी माझा विषय तुम्हाला तेवढ्या वेळेत स्पष्ट होईल असेल बोलतो.. , मी एक मिनिटात विषय सांगू शकतो किंवा हवे असल्यास १० मिनिटे त्याच विषयावर बोलू शकतो किंवा तासभर त्या विषयसंदर्भात बोलू शकतो ' म्हणजे मुलाखतकारांना नंतर एडिटची वगैरे गरज पडणार नाही.
*घड्याळ लावून वेळेत समोरच्याला हवे ते देण्यात डॉक्टरांचा हातखंडा .. '* बापरे ! म्हणजे किती ती दुर्मिळ अचूकता किती ते सूक्ष्म अध्ययन ! आणि त्याच वेळी किती तो अफाट अभ्यासपूर्ण विचार ! आणि तितकेच त्रुटीरहित अचूक नियोजन ! हा अनुभव तर वाचून ऐकून आपणास माहीत असला तरी प्रत्येक वेळी ऐकताना हा अनुभव थक्क करणारा नितनवा असा आहे. असे बरेचसे अनुभव व्यक्त करताना, मर्यादित वेळेत सामान्यजनांस माहीत नसलेल्या डॉक्टरांच्या विविध पैलूंचे, जीवनातील अनुभवांचे आणि कार्याचे दर्शन घडवून एरव्ही अंनिसच्या मंचावर क्वचित दिसणारे साधना संपादक विनोद शिरसाठ यांनी थक्क केले. विनोदजिंनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातच मानवतेचे सच्चेसुपुत्र शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचेही जणू शब्दस्मारक उभे केले. कृतज्ञभावाने सोहळ्यासाठी एकत्र आलेल्या डॉक्टरांच्या अफाट कामगिरीमुळे प्रेरित कार्यकर्ते आधीच डॉक्टरांबद्दल हळवे असताना, ह्या जाहीर अनुभवकथनाने सद्गदित आणि भारावून गेले होते. प्रश्नोत्तरांसाठी दिलेल्या काही वेळेत बहुतांश लोकांनी अभिप्रायच दिला अनिंती देताना अनेक कार्यकर्त्यांनी साधना संपादक विनोद शिरसाठ यांचे मनप्पूर्वक आभारच व्यक्त केले.
पृष्ठ २. ......क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा