Open ओपन
खूप वर्षे हरवलेली स्मृती अचानक समोर यावी आणि जिने आपल्याला झपाटून टाकावे असे काहीसे माझे झाले ... चार दिवसापूर्वी ह्या पुस्तकाची निसटती पोस्ट पाहिली आणि माझे टेनिस प्रेम जागे झाले. जगातील एकमेव मैदानी खेळ ज्यात मला रस असून तो ही मी कधीच खेळलेलो नाही असाच खेळ ( मी आयुष्यात एकही खेळ खेळलेलो नाही कधीच ).. पण टेनिस चे सामने टीव्ही वर पाहण्यात रमून जात असे . तेवढे एकच मला सहज उपलब्ध होत असे..
तर ह्या पुस्तकाची पोस्ट पाहिली आणि मराठी आवृत्ती शोधली , सापडली मागवली आणि paperback पुस्तक काल हाती पडले..
....आंद्रे आगासी हा काही तसा माझा आवडता खेळाडू नव्हता.. टेनिस मधील एक तारा म्हणजे तारका स्टेफी ग्राफ ही माझी आवडती खेळाडू. तिचे सामने भान हरपून मी पाहत असे.. आणि हे पुस्तक हाती पडे पर्यंत ह्या दोघां मधील विशेष संबंधाचा विसर पडला होता.. पुस्तक हाती पडले नी चाळू लागलो नी आठवले की स्टेफी ने ह्याच्याशीच लग्न केले होते.. गूगल केले नी पुस्तक मागवल्याचे चीज झाल्या सारखे वाटले.. तर हे नमन पुन्हा कधीतरी ..
.... ओपन हे पुस्तक हाती पडले नी सवयी प्रमाणे अक्षर नी अक्षर शीर्षकापासून PUBLISHER डिटेल्स सर्व काही वाचून काढले...
अर्पण पत्रिका , भावाचे पत्र झटकन वाचले नी पहिलेच प्रकरण ज्याचे नाव शेवट असे आहे वाचून काढले... 40 पाने अगदी चित्त थरारक .. वीट आणणाऱ्या टेनिसला दिलेले आयुष्य मांडताना आंद्रे ने शेवटचा सामना असा काही व्यक्त केला आहे की विश्व विख्यात खेळाडू चा . विसर पडतो .. आणि फक्त प्रांजळ आत्मकथन लक्षात उरते... संक्षिप्त पणे उल्लेख झालेले त्याचे बालपण त्याचा भोगलेला त्रास हरवलेले बालपण . इतके तीक्ष्ण व्यक्त झाले आहे की .. आंद्रेने अगदी मला माणूस म्हणून स्वप्नांचा पाठलाग करणारा एक वेगळाच नायक दाखवला.. ज्याच्या बद्दल मी कधीच विशेष प्रयत्न घेऊन माहिती घेतली नव्हती.. आज त्याने त्याच्या आत्मकथनातून मला त्याचा चाहता बनवून टाकले आहे..
पहिलेच प्रकरण आणि त्याची निवृत्तीची चर्चा याने इतके थरारून टाकले आहे की पुढे त्याच्या आयुष्यातील भयंकर अनुभवांची गाथा पुढे वाचूच नये असे वाटून मी तूर्तास थांबलो आहे आणि ही हूरहूर थांबण्याची वाट पाहत पुस्तक घट्ट हृदयाशी धरून आहे...
Thank You Andre.. ..*अँब्रोस चेट्टियार*
https://www.facebook.com/share/p/Tsn1bP5NHx8Si1Me/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा