आवाहन
आवाहन
कोण्या रावणाचे छाटू गे शीर
कोण्या दुर्जनाचे उपटू हात
कोण्या महालाला जाळू गे माये
कोण्या बाणाने करू भस्मसात,
एकसाथ, बलात्कारी जमात...
हाती धरुनी राजदंड नी
स्वर्णाभूषण धन कनात
किळसवाण्या ओंगळ नजरा
विकट भयंकर हास्य प्रपात
सारे चेहरे एकसारखे,
बरबट घाणपुरित तैनात
फुलण्याआधी कुसुम कुस्करून
लोटती अट्टाहासे दैन्यात
हेरून एकेक नराधम तो
तात्काळ धाडू वाटे यमसदनास
अनंत शक्ती लेखणीबळ का
न्याय* त्यागून हास्यास्पद आज
आज पुरुष का नुरला कोणी
हतवीर्य तो हतप्रभ प्रभुचा
कालीरूप जगदंबा धरता
नरमुंडमाळ अगणित मग गणता..
सत्यानाशा प्रकृति* सृष्टिचा
धजावणारा देह दंडण्या
अधमातुन मानव घडविण्या
स्वत्व रक्षण्या स्त्रीत्व रक्षण्या
उच्च कोटिचा विचार मूर्त व्हा
न्याय्य न्याय व्हा सर्वोपरि व्हा
*©अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा