सोपी शिकवण
सोपी शिकवण
हाडाचा शिक्षक
कोणाला कळावा
कोणाला मिळावा
योग आहे
आठवा ती शाळा
बालपण रम्य
सोन्याचे ते दिन
आज वाटे
नको वाटायचे
शाळेचे ते पाठ
सवंगड्यांसाठी
हवी शाळा
खेळातून घट्ट
समाजाची वीण
भेद बाकी नाही
कोठे काही
उपटे कोठुनी
अचानक भेद
खाणे नी राहणी
वस्त्र आदी
टिळा शिखा टोपी
अंतर वाढवी
भेदाची काच नी
आच मनी
आश्चर्य ते आज
जाणोनी या खंत
शिक्षकाची काही
साथ काहे
म्हणोनी शिक्षक
होणे नाही सोपे
वाट ती फुंकावी
निरंतर
शिक्षकाचा धर्म
ज्याला तो कळला
त्यालाच मानव्य
समजले
नवीन जीवाचे
संगोपन कार्य
देशाचे ते कार्य
असताहे
फुलाने फुलावे
वाऱ्याने वहावे
शिकवणे व्हावे
सृष्टीसम
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा