योग्य तेच करा
योग्य तेच करा
वर वर चुकीचे
वाटले दिसले असले तरी
पुढचे मात्र बरोबरच करा
योग्य तेच करा
मताचे दान सत्पात्रीच करा
कुणी धमक्या दिल्या
कुणी आमिष दिले
त्याला घाबरून दाबून जाऊ नका
घाबरला जरी असाल तरी
आमिषाला बळी
पडला जरी असाल तरी
मताचे दान योग्य ठिकाणीच करा
कोणी कोणाला मताचे दान दिले
हे कळत नसते कोणाला
त्यामुळे निश्चिंत राहा
आणि आपले कर्तव्य चोख पार पाडा
तुमच्या एकंदर भल्याचे तुम्हीच पाहा
योग्य माणूस पारखून घ्यावा
एकेक मताने पारडे फिरू शकते त्यामुळे
मताचा योग्य वापर जरूर करा
योग्य करा निश्चित करा हवे त्यालाच मत द्या
कानी कपाळी कोणी ओरडो कितीही
सूज्ञ तुम्ही योग्य तोच निवडा
.... मर्मभेदी समर्पक समयोचित ते
कर्तव्यपूर्तीने शिर उंच होते...
इति विचार संपूर्ण..
🙏🏿
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा