विवेक विज्ञान
विवेक विज्ञान
जाणीव नेणीव भगवंती नाही
संतवचन स्पष्ट जाणतो कोण
आजही बुडाला शोधीत तयाला
अस्तित्वच ज्याचे भूतळी नाही
माणूस जाणावा भूत तोषवावा
प्रेमभाव जगी स्थापित तो व्हावा
वृक्ष वल्लरींची प्राणीयांची साथ
आणखी न कोणी जगी येतजात
मनाचे सांगणे मनास कळावे
कोणी ओळखावे माणसाने
एकमेका साथ द्यावी घ्यावी आस
आणिक कोणाची जाय व्यर्थ
ऐकताहे कोणी मनाचे गाऱ्हाणे
आधी सोड मना फुकाचेहे खूळ
विद्युत लहरी आणि चुंबकत्व
ब्रम्हांडाचे कारण गुरुत्वाकर्षण
माणसाचे मन एक रसायन
शोधे सोपे मार्ग रंजनाचे
आळस भीतीचे आवरण घट्ट
फुकाचे चिंतन गूढ तत्वी
विवेक विज्ञान चतुरस्त्र ज्ञान
करी उन्नत मस्तक माणसाचे
हाच एक मार्ग चालण्यास खरा
बुध्दीप्रामाण्याची होय सुरुवात
बुध्दीप्रामाण्याची होय सुरुवात
*©अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा