ऐका माजी गोष्ट.. बाई ss

ऐका माजी गोष्ट.. बाई ss


बोबडंच बोलणं

पुरेसं वाकडं

कधी तोंडातनं लाल गळंल

कळायचं नाs ही sss...

पन 

लावली का न्हाई थुकी

मोठ्या मोठ्याला 

बाई ssss


माझा नवरा 

लै मोठा तालेवार

थुकी उडवून करतो समद्यांना गार

मधेच कोनी आला हुडकत

कायद्याचा फौजदार

त्याला मी ss 

व्हय व्हय 

मी सुध्दा 

गोष्टी सांगून 

करते लै बेजार 

पार ठार 

बाई sss 


संस्कारांचा बिंजिनेस आमचा, 

फक्त लोकांना द्यायचा अन् शिकवायचा

'इमानानी वागावं मेहनतीचं खावं '

तुमि इमानानी वागावं 

तुमच्या मेहनतीचं आम्ही खावं 

यातच तुमचा गौरव आहे की नी

आमच्या वाटणीचं थोडं तुम्ही 

दक्षिणा देऊन फेडलं तर 

त्यात बी तुमचाच गौरव 

आम्ही डायरेक आलो न्हवं का 

नपेक्षा तुमचा उद्धार व्हावा कसा


चला नगा चिवडू कथा 

नगा दवडू काळ

आमच्या रुपात तुमचा ईश्वर 

बसला ठाई ठाई त्रिकाळ

इतका इचार करू नगासा..

काही बाही 

ही मूर्ती ती मूर्ती सारखीच

बाई ssss 

  *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी