टोळक्यात
टोळक्यात...
नाही नाही तू म्हणतोयस ते खरंय काका.. पण माझ्या टोळक्यात ते घुसलं पाहिजे ना ..
अरे टोळक्यात नाही टाळक्यात असतं ते ..
अरे असं कसं तुझ्या टाळक्यात घुसत नाही ?
म्हणजे तूच लक्ष देत नसशील विपीन ..
बाकी कसे पास होतात ?
ते मला माहित नाही...
पण माझं डोकं दुखायला लागतं अभ्यास करून करून...
आणि घरी तर विचारूच नको.. सगळे माझ्यावरच डाफरत असतात..
काय रे अभ्यास झाला का ?
कुठे निघालास ?
अजून झोपलायस का ?
आता येतोयस ?
अरे बाथरूम मध्ये किती वेळ?
टीव्हीच काय बघतोयस इतका वेळ ?
फोन किती वेळ हातात आहे तुझ्या ?
अरे किती वेळा खेळायला जातोयस ?
सगळे मलाच प्रश्न विचारतात..
फक्त विचारतात...
त्यांना माझं उत्तर काही ऐकून घ्यायचं नसतं ..
फक्त प्रश्न विचारायचे असतात..आणि माझ्या वर दादागिरी करायची असते..
शी ss या पेक्षा
एखादा कुत्रा झालो असतो तरी चांगलं झालं असतं
...
(जीभ बाहेर काढून हलवतो..)
हे काय आता ..
कुत्रा होऊन पाणी प्यायची प्रॅक्टिस करत होतो . ते पण करू देणार नाही तुम्ही लोक...
हा हा हा ..
तुझं काही खरं नाही बाळा ..
अरे सुधार रे स्वतःला ... हे बघ उद्यापासून काही दिवस तू माझ्या कडे ये आपण माझी बाग नीट लावून घेऊ ..बाकी मी सांभाळतो..
Wow काका तुझी बाग, दॅट्स my favourite . काका तुला सांगू मला बोन्साय करता येतो..
हो का अरे वां.
हो मग काय ... plants, pots, माती, खत सर्व सर्व मला छान जमतं.. चल मी आताच bag भरतो... खरंच तू मला तुझ्या गार्डन मध्ये काम करू देशील ना...
अरे म्हणजे काय .. चल तू बॅग भर ...
वहिनी, दादा... मी विपीनला आठवडा भर घेऊन जातो.. मग पुढचं पुढे बघू...
भावोजी जमलं तर कायमचीच घेऊन जा please ती ब्याद तिकडेच...
अम्म हं ( मूठ वळतो दात ओठ खातो )
चल काका मला नाही राहायचं इथे आता..
चल..
विपिन, तुझ्या नावाचा अर्थ तुला माहीत आहे ?
काय ?
चल तुला वाटेत सांगतो...
चल....
बाहेर जातो ...परत धडपडत आत येतो....
ऐकलं का श्रीमान पिताश्री आणि श्रीमती आई ...
मी चाललो कायमचा काका कडे ... बाय बाय...
इथे माझं टोळकं फिरवलंय तुम्ही लोकांनी ..
आई बाप दोघे आतून ओरडतात..
अरे टोळकं नाही टाळकं असतं ते . .
.......Ambrose Chettiar
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा