खरंच हे खूप दुःखद आणि निराशाजनक आहे... गांधीजींनी अवघ्या जगाला प्रेरणा दिली सर्व जाती जमातींच्या पलीकडे जाऊन एकता समता आणली.. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात उभे करण्यात खंबीरपणे मोठे कार्य केले पण तरीही आपल्या कडे घोषणा देतानाही शाहू फुले आंबेडकर असेच एवढेच म्हटले जाते गांधी वगळला जातो.. गांधी नसते तर कदाचित भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्वरूप जागा वेगळे झाले ये तसे झाले नसते कदाचित इतरांच्या मार्गावर पाऊल टाकून भारत पुढे गेला असता तो किती गेला असता हे मात्र सांगता येत नाही.. कारण भारत विभिन्न राज सत्तांत विभागलेला होता.. आणि तो तसाच राहण्याची जास्त शक्यता होती.... देश पिंजून काढून एकतेची भावना निर्माण झाल्याने आणि निवडलेली वाट जगावेगळी असल्याने भारत नेत्रदीपक कार्य सर्वच क्षेत्रात करू शकला ज्यामुळे भारताचे नाव स्वातंत्र्यानंतर लगेच घेतले जाऊ लागले.. अर्थात आपाआपल्या नेतृत्वात विभिन्न स्तरावर केलेले जननेत्यांचे कार्य विसरता च येत नाही पण गांधींनी सर्वांना एक सूत्रात बांधण्याचे केलेले कार्य हे खूप मोठे आहे... ह्याची जाण ठेवून आपण सर्व भेद विसरून एकत्र आलो तर आया सारखे आपणच असू नेमके हेच जगातील अनेकांना नको आहे हे आपण का ओळखत नाही ... हे अनाकलनीय आहे ( तसे इतकेही अनाकलनीय नाही म्हणा) एकत्र येवून आपले घर आपणच सावरायला हवे एकजुटीने बाहेरच्यास उत्तर देणे सोपे होते... आपल्यातच भेद निर्माण करून कोणीतरी निवांत मलई खात आहेत हे न कळण्या इतके काही आपण अज्ञानी नाहीच
माय मराठी
माय मराठी थोर मायेचे गा बोल राखे मानवाचे शील अशा उत्तुंग भाषेला लाभे संत जण मेळा भले थोर आले गेले त्यांच्या निशाण्या सांडल्या त्यांच्या बखरीत गुण गाती इथल्या चांगल्या इतिहास साक्षी झाला गोड मराठ्यांचा मेळा जगदूर कीर्ती झाली माझा राजा वाखाणला माझी संताई मुक्ताई विश्व जाणतो ज्ञानाला नाही भेद सान थोर ज्ञान बुद्धीचा भुकेला परी का हे विपरीत घडे अज्ञानाचे कोडे बुद्धी निर्मिक निर्मीत तरी भुताचे वावडे कुणी दीन हून आला कुणी कला दावायाला दिली ओसरी परक्याला ताटातला घास दिला येई जाई त्याचे गुण गाते मराठी आपली कोण सख्याचे सोयरे जाण नाही मनी केली काय परतावा दिला भल्या यजमाना टोला भलाईचा काळ गेला कोण पुसे याचकाला कोणी आतून पोखरे कोण पाठीशी दे घाला कोणी शब्द लाथाडोनी देतो डागण्या पोटाला उलटला अतिथी का चूक कोण काय बोला माझी मराठी भाबडी कशी फसते खोट्याला © अंब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा