पंढरीची वारी
पंढरीची वारी
पंढरीची वारी
काय सांगु रंग
पावलोपावली
भेटतो श्रीरंग |
वाजता मृदुंग
धाव घेई मन
डोळ्यास एकच
आस पांडुरंग |
होउनी निसंग
भ्रातृभाव मेळा
वाहतो समुद्र
पाहण्या विट्ठला |
आषाढी दर्शन
भक्तांचा सोहळा
उभा दर्शनासी
लेकुरवाळा |
कष्टकरी धावे
देवास पाहण्या
विट्ठल सामोरा
भक्तास भेटण्या |
ऊर भरोनी ये
प्रेमे आलिंगन
ठायी ठायी भेटे
मायबाप विट्ठल |
मुख पाहोनी हो
तृप्त जन मेळा
एकरूप सारे
विट्ठल विट्ठल |
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा