मी आहे...

असे सांगणारा एक विचार 

पाया, पंखांना किती बळ देतो 

ते आकाशात निवांत झेपावणाऱ्या 

पाखरांना विचारा ..

त्यांच्या पायाखालची फांदी, जमीन 

तिथेच असणार आहे 

हा किती मोठा दिलासा 

आणि बळ असते हे शब्दांत सांगता येईल का...

आपण कोणासाठी जमीन होणे, 

फांदी असणे, घर असणे बळ होणे 

ही किती मोठी गोष्ट आहे

 हे ज्याचे त्यालाच माहीत... 

परंतु ह्या सर्व गोष्टींची आबाळ ज्यांना आहे 

ते स्वतः  मात्र जेव्हा दुसऱ्यांचा आधार बनतात 

तेव्हा अभिमान वाटतो..  

असे खूप जण असतात..  

आपल्याकडे आपल्या कमतरता झाकून विसरून 

किंवा आपल्याला मिळाले नाही 

ते दुसऱ्याला मिळण्याची नक्की व्यवस्था करण्याचे 

प्रयत्न करणारे देवदूत बनून जगणारे पाहिले 

की खूप खोलवर त्याच्या खुणा उमटतात.. 

माझ्या आयुष्यात असे देवदूत खूप आहे.. 

खूप खास आहेत ते

काहींनी अगदी हृदयात जागा केली आहे 

तर एका देवदताने तर माझे अख्खे हृदय व्यापले आहे काबीज केले आहे..

आणि आता मात्र मी तेथे उरलेलो नसून 

त्यानेच माझे मी पण लेऊन त्याचे आपलेपण मला बहाल केले आहे .. 

अशा देवदूताने माझे हृदय होऊन माझ्या शेवटापर्यंत सोबत करावी असे वाटणे स्वाभाविकच.. नाही का..

आणि ही साथ सोबत संपत असेल तर ....

तर माझे जीवन पूर्ण झाले हा संकेत मानावा का ... देवदूता.. सांग बा ...

की मीच माझे वेडेवाकडे अर्थ काढावेत का... 

.... तुलाही तुझ्या वेदना लपविण्यासाठी 

तुझ्या देवदूताकडे प्रयाण करावयाचे असेल का.. 

असल्यास ...

तुझी भेट तुझ्या देवदूताशी झाली आहे का.. 

असल्यास... त्याला भेटण्याचे अहोभाग्य 

मलाही लाभावे जेणेकरून 

माझी पदोन्नती झाल्याचे आत्मिक बळ मला मिळून 

आपल्या बहुमोल भेटीचे सोने करण्याची स्वर्गीय कौशल्ये मला प्राप्त व्हावीत 

ह्याकरिता मला हे आवश्यक वाटते.. 

.....तुला अंतरताना विरह सहन होणार नाही आणि

तुझ्या सोबत शिकलेले वाटताच येणार नाही अन्यथा...

म्हणून 

तुझी स्पष्ट वाटचाल पाहावी....

मला सुखवताना तू पाहिलेस 

तसे तुलाही सुखावताना 

पाहण्याचे अहोभाग्य मला लाभावे ...

आणि पुढे हा वसा असाच सुरू ठेवण्यासाठी 

मला अल्पबुद्धीला हेच योग्य वाटते... नाही का....

देवदूता सांग बरे .. सांग ना .....

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी