तुझ्यातल्या तु ला 

जाणून घेण्यास मी 

कमी पडलो 

माझ्यातल्या म ला 

तू जाणले आहेस का ?


तसे जाणले असते 

तर आज हे अंतर राहिले नसते.

तुझ्या मनावर फुंकर घालायला मन तत्पर असते 

अनामिक कोशात गुरफटून गेली आहेस.. 

नकोना असे एकटे वाटून घेऊस हृदयाचे पाणी पाणी होते गं  

माझाही विचार कर 

मी तर सर्वस्वी तुझाच आहे.. 

मला वेगळे अस्तित्वच उरले नाही.. 

मला इतकेच कळते 

तू आनंदी आहेस तर मला सर्व प्राप्त. 

मला तेवढे जाणायचे हक्क तरी असुदे... 

तेवढीच भग्न हृदयाला शांती...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी